माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंच होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत.